- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा साप दिसून आला की,अंगावर शहारे येऊन अनेकांची घाबरगुंडी होत असते.साप विषारी की बिन विषारी,याकडे कुणीही बघत नसतो.काहीजण सापाला मारण्याचा प्रयत्न करतात,तर काहीजण मोबाईल काढून पटकन सर्प मित्रांना कळवतात.सर्प मित्र क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीला धावत असतात.आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता ‘फ्रंटलाइन वर्कर’ होणार आहेत.शासनाकडून सर्पमित्रांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ चा दर्जा देण्याची तयारी असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी शिफारस केली आहे.विशेष म्हणजे, शासनाच्यावतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र ही दिले जाणार आहे.ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी,विशेषतः सापांपासून
होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल,असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.त्यामुळे जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सर्प मित्रांसाठी सरकार सकारात्मक भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.
- Advertisement -

