Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाळी अधिवेशनाची सांगता; नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर..

पावसाळी अधिवेशनाची सांगता; नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य विधिमंडळाचे पावसाळी  अधिवेशन सोमवार ३० जून पासून मुंबईत सुरू होते.पावसाळी अधिवेशनाचा आज,शुक्रवार १८ जुलै रोजी शेवटचा दिवस होता.तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या परिसरात काल गुरुवारी जोरदार हाणामारी झाली.त्याचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले.विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला. दरम्यान,आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली.आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपुरात होणार असून याबाबत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत,तर विधानपरिष सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत घोषणा केली.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा अपमान व इतर मुद्दे उपस्थित करून सभागृह चांगलेच गाजवले होते.काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोदी तुमचा बाप असेल,शेतकऱ्यांचा नाही,असे म्हणीत सभागृहात खडाजंगी केल्याने त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.परत दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात काहीकाळ गदारोळ उठला होता.अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आपल्याच सरकारला धारेवर धरतांना आढळून आले.मात्र,पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवसापूर्वी लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळास गालबोट लागले.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!