Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीशाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच घेण्यात यावा- जिल्हाधिकारी...

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच घेण्यात यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा -गडचिरोली,देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात काल सोमवारी झालेल्या मुसळधार पावसासोबतच गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गाच्या पार्श्वभूमीवर,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना “घाबरू नका, पण सतर्क राहा” असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत.
नदीकाठच्या गावांमधील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पंडा यांनी देसाईगंज,आरमोरी व गडचिरोली तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आज,मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रसेनजीत प्रधाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,तसेच सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी गडचिरोली,देसाईगंज(वडसा) आणि आरमोरी तालुक्यातील नदीकाठच्या आणि शहरातील खोलगट भागात पोलिस,जिल्हा परिषद व महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे तसेच शासकीय निवारा केंद्र येथे सर्व स्थलांतरीतांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे सांगितले.त्यांनी पुरप्रवण क्षेत्रात प्रत्येक तहसील स्तरावर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवत संभाव्य पूरपरिस्थतीचा विचार करून बचाव व स्थलांतरणासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले असून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावा,असे निर्देश दिले आहेत.
पूलावरून पाणी वाहत असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व  सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे.पोलीस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!