- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-यंदाचे पाऊस प्रमाणापेक्षा म्हणजेच शंभर टक्के पेक्षा जास्त बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून यापूर्वीच वर्तविण्यात आली आहे.पावसासाठी पूरक असे वातावरण तयार होऊ लागल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसू लागला आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे यंदाच्या पावसाळी पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सतत पाऊस कोसळत राहिल्यास धान पऱ्हे होणार की नाही? अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.अश्यातच आता विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पुढील २४ तासांत आणखी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यानुसार सायंकाळी ७ वाजे पासून गडचिरोली जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत आहे.दरम्यान,काल रविवारपासून गडचिरोली,भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून काही मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले.आज,सोमवार ७ जुलै रोजी भंडारा ते कारधा नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी आणि चुल्हाड ते सुकळी नकुल दोन मार्गांवर पाणी आल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत.अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कुरखेडा तालुक्याच्या मांगदा ते कलकुली मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे,पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
- Advertisement -

