- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतांनाच गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका नराधम डॉक्टरने उपचार करण्याच्या बहाण्याने पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून बलात्कार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी बुधवार २ जुलै रोजी घडली.४८ वर्षीय नराधम डॉक्टर कोरची तालुक्याच्या बोरी गावातील रहिवासी असून सुभाष हरप्रसाद बिस्वास असे त्याचे नाव आहे. प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बेडगाव पोलिस मदत केंद्रात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४ (२) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता कुरखेडा न्यायालयाने त्यास काल,गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छत्तीसगड राज्य हा कोरची तालुका मुख्यालयापासून
हाकेच्या अंतरावर आहे.त्यामुळे पलीकडच्या राज्यातील काही नागरिक कोरची शहरात बाजारासाठी वा इतर कामांसाठी नेहमी येत असतात.अश्यातच पिडीत तरुणीला हगवणचा (जुलाब)त्रास होऊ लागल्याने घटनेच्या दिवशी २ जुलै ला ती भावासह दुचाकीने उपचारासाठी कोरची तालुक्यातील बोरी गावात सुभाष बिस्वास याच्या खासगी दवाखान्यात सकाळच्या सुमारास आली होती.सकाळी ९ वाजता डॉ.सुभाष बिस्वास याने भावाला बाहेर बसवले तर तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून टेबलावर लेटायला लावले व घृणास्पद कृत्य करून अत्याचार केला.पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानंतर बाहेर बसलेल्या भावाने आतमध्ये धाव घेत डॉ.सुभाष बिस्वासला ठणकावले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देऊन धमकावू लागला.त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोरचीच्या बेडगाव पोलिस मदत केंद्रात जाऊन तक्रार दाखल केल्याने सदर प्रकार उघडकीस आला.त्यानुसार नराधम डॉक्टरला अटक करून न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्रातील महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करीत आहेत.
- Advertisement -

