Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततीन महिला व एक पुरुष नक्षली ठार.!

तीन महिला व एक पुरुष नक्षली ठार.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र-छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यात मध्य प्रदेश राज्याच्या विशेष दलासह जिल्हा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी पंचमदार आणि कटेझिरिया जंगलांत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.यात तीन महिला तर पुरुष नक्षलवाद्याचा समावेश आहे.कारवाईत एक ग्रेनेड लाँचर,स्वयंचलित रायफल,दोन पॉइंट ३१५ बोअर रायफल्ससह इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवणे सुरू असून बालाघाट हा जिल्हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो.जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये काल शनिवारी चकमक उडाली.सदरची चकमक ही मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या बैहर तालुक्यातील पंचमदार आणि कटेझिरिया जंगल परिसरात घडली.काही नक्षलवादी पंचमदार आणि कटेझिरिया जंगल परिसरात दडून बसल्याची माहिती जवांनांना मिळाली होती.त्यानुसार पथके रवाना करण्यात आली.शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.यात जवानांनी प्रत्युत्तर देत चार नक्षलींना यमसदनी धाडले.परिसरात शोध मोहीम राबवली असता तीन महिला नक्षली व एक पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आल्याचे उघड झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!