Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाशिकार करून मांस शिजवणाऱ्यांना गंजासकट उचलले घरून..

शिकार करून मांस शिजवणाऱ्यांना गंजासकट उचलले घरून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-वन्य प्राण्यांची शिकार करून चोरी छुपे
मांस खाणाऱ्यांची संख्या चंद्रपूर,गडचिरोली व इतर जिल्ह्यात भरपूर आहे.वन्य प्राण्यांची शिकार करणे वन्यजीव कायद्यानुसार मोठा गुन्हा मानला जातो. सापडला तर चोर अन्यथा शिरजोर.अश्यातच एका चितळाची शिकार करून मांस शिजवत असल्याची खबर वन विभागास मिळताच धाड टाकत शिकार करून मांस शिजवणाऱ्यांना गंजासकट चार जणांना घरून उचलल्याची घटना नुकतीच गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या जांभळी गावात घडली.चितळ प्राण्याची शिकार झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली.त्यानंतर,वन विभागाच्या पथकाने आरोपी लालचंद मेश्राम याच्या घराची चौकशी केली असता एका जर्मन भांड्याच्या गंजीमध्ये चितळाचे मास शिजवलेले आढळले. त्यावरुन,वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक तपास करत चितळची शिकार करुन मांस खाणाऱ्या चौघांना अटक केली आहे.लालचंद मेश्राम,आनंद शेंद्रे, संतोष शेंडे आणि पुरणलाल जगनित असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.या चारही आरोपींना ७ जूनपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!