Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांनी पेरणीच्या नियोजनासाठी स्थानिक हवामान अंदाजाचा आधार घेण्याचे आवाहन..

शेतकऱ्यांनी पेरणीच्या नियोजनासाठी स्थानिक हवामान अंदाजाचा आधार घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात गेल्या आठवड्यात  पावसाने धुव्वादार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसात धान भिजून काळपट रंगाचे झाल्याने शेतकऱ्यांना कमी किंमतीत धान्य विक्री करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे लागत खर्चही निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भेडसावत असतांनाच पुढील हंगामाची चिंता वाटू लागली आहे.अश्यातच आता हवामान खात्याकडून शेतकरी बांधवांना पेरणीच्या नियोजनासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.यात येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आहे.पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर अत्यल्प राहणार असून,६ ते १० जून दरम्यानही पावसाची स्थिती साधारणच असेल. वाऱ्यांचा वेगही कमी झाला असून,पुढील १० ते १५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.यामुळे मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.मात्र,आता पावसाचे प्रमाण  गेल्या आठवड्यापेक्षा खूपच कमी असणार आहे.त्यामुळे पाऊस आता उघडीप करणार आहे.मे महिन्यात सरासरीपेक्षा १० पटीने अधिक पाऊस झाल्याने शेतशिवारात चिखल झाला आहे.याचा परिणाम खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींवर झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी वाट पाहावी लागत आहे. काळ्या,खोल जमिनीत पेरणीयोग्य जमीन येण्यासाठी किमान १० ते १५ दिवस लागतात.मात्र,पुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान उभे आहे.पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला,तरी मशागतीसाठी पुरेसा वेळ आणि योग्य हवामान मिळणे गरजेचे आहे.हवामान खात्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून,पेरणीच्या नियोजनासाठी स्थानिक हवामान अंदाजांचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!