Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा..

अखेर महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे.त्यामुळे तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला आहे.कारण येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या,असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका लागतील.चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची घोषणा होईल.तर सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका करोना काळापासून घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व महापालिकांमध्ये प्रशासकांद्वारे कारभार सुरु आहे.त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या विविध महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे.ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा प्रश्न जैसे थे ठेवण्यात आला होता.मात्र आता निवडणूक घ्यायला सुरुवात करा,नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या की जुन्यानुसार,ओबीसी आरक्षण यासारख्या मुद्द्यांवर सुनावण्या होत राहतील.मात्र येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारनेही कुठलेही आक्षेप नसल्याचे सांगितले. त्यामुळे चार महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!