Tuesday, September 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलिंचा मुख्य तळ मानल्या जाणाऱ्या डोंगरावर सुरक्षादलाचा ताबा.. - आजवरचे सर्वात मोठे...

नक्षलिंचा मुख्य तळ मानल्या जाणाऱ्या डोंगरावर सुरक्षादलाचा ताबा.. – आजवरचे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान; २४ हजार सुरक्षा रक्षकांचा सहभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी ठोस कार्ययोजना आखली आहे.अशातच २१ एप्रिल पासून सुरू झालेल्या अभियानात छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील सुमारे ५ हजार फूट उंच असलेल्या आणि नक्षलवाद्यांचा मुख्य तळ मानल्या गेलेल्या कर्रेपट्टा डोंगरावर अखेर सुरक्षादलांनी पुन्हा ताबा मिळवला आहे.नऊ दिवस चाललेल्या कठोर लढ्यानंतर, सुरक्षादलांनी हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेत तिरंगा फडकवला.हा भाग नक्षल नेता हिडमा,देवा,दामोदर, आझाद आणि सुजाता यांचा गड मानला जात असे.परंतु आता या भागावर पूर्णपणे सुरक्षादलांचे नियंत्रण आहे.हे अभियान छत्तीसगडमधील बस्तर परिसरात आजवरचे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान मानले जात आहे.
या मोहिमेत जिल्हा राखीव दल,बस्तर फायटर्स,विशेष कार्यदल,राज्य पोलीस दलाच्या सर्व युनिट्स,केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांचे विशेष कमांडो ‘कोब्रा’ बटालियन यांनी सहभाग घेतला होता.सुमारे २४,००० सुरक्षा कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.कर्रेपट्टा आणि दुर्गमगट्टा या डोंगरांच्या घनदाट जंगलात ८०० चौरस किलोमीटरच्या परिसरात २१ एप्रिलपासून हे अभियान सुरू झाले.हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने, सुरक्षादलांनी उंचसखल भागात प्रवेश करत नक्षलवाद्यांना हुसकावून लावले.हा डोंगर पूर्वी माओवादी ‘जनमुक्ती गुरिल्ला लष्कर’ (पीएलजीए) च्या बटालियन क्रमांक १ चा मुख्य तळ होता.हे नक्षलवादी या भागातील आदिवासींवर दबाव टाकून सुरक्षित आसरा घेत असत.आता मात्र सुरक्षादलांनी तो संपूर्ण भाग नक्षलांपासून मुक्त केला आहे.पीएलजीए,तेलंगणा राज्य समिती, दंडकारण्य विशेष झोनल समिती आणि मध्यवर्ती प्रादेशिक समिती या नक्षली संघटनांच्या यांच्या हालचाली पूर्णपणे बंद पाडणे हा या मोहिमेचा उद्देश होता.या ठिकाणी जवळपास ५०० नक्षलवादी होते,अशी माहिती सूत्रांनी दिली.छत्तीसगड सरकारने स्पष्ट केले आहे की,हिंसक मार्ग स्वीकारणाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही.आत्मसमर्पण करणाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार मदत आणि पुनर्वसन दिले जाईल,परंतु हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!