Saturday, June 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारावर गुन्हा दाखल..

अखेर महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील महाराष्ट्र पोलिसांबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी  वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गायकवाड यांनी म्हटले की,महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही,पोलिसांनी जर ५० लाख पकडले तर ते ५० हजार दाखवतात,सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो,जर पोलिसांनी ठरवले की,एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही,तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल,असा महाराष्ट्र पोलिसांवर थेट आरोप केला आहे.महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी,अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की,गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल.मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला.मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते.महाराष्ट्र पोलिसांचे धाडस,कर्तृत्व विसरता येणार नाही.ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल,त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र,काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या ‘आभार यात्रे’साठी आज रविवार २७ एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी काल शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्याविषयी अपशब्दाची माहिती दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!