Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'आनंदाचा शिधा' योजनेला शासनाचा थांबा..!

‘आनंदाचा शिधा’ योजनेला शासनाचा थांबा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक नुज वृत्त :-शासनाने सर्वसामान्यांना सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता यावा,तसेच सणाला गोडधोड पदार्थ करून घरातील सदस्यांचा आनंद द्विगुणित व्हावा,याकरिता ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती.नुकत्याच झालेल्या होळीच्या सणालाही आनंदाचा शिधासोबतच साडी देण्याची घोषणा केली होती.पण,या होळीला शिधाच आला नाही.सर्व शिधापत्रिकाधारकांना ४ ऑक्टोंबर २०२२ पासून आनंदाचा शिधा वितरित केला जायचा.आतापर्यंत दिवाळी,गौरी गणपती,श्रीराम नवमी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व यंदा होळीलाही आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शासनाने केली होती.त्यामुळे साडीसोबतच आनंदाचा शिधा मिळणार असल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु,अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘आनंदाचा शिधा’ या योजनेला शासनाने थांबा दिल्याने लाभार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे.तर होळीनिमित्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साडी देण्याविषयी सांगण्यात आले असले,तरी काही ठिकाणी साड्यांचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजना,आनंदाचा शिधा,ज्येष्ठांना मोफत बस प्रवास, महिलांना सवलतीत बस प्रवास,तीर्थदर्शन योजना अशा अनेक लोकप्रिय घोषणा करून ठेवल्या.ऐन निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफीबाबतदेखील सूतोवाच करण्यात आले होते.मात्र,या घोषणा करत असतांना आर्थिक स्थितीचा विचार झाला नसल्याचे आता दिसून येत आहे.यामुळेच टप्प्याटप्याने या योजनांना कात्री लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप होतो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!