Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीबुद्धाचे विहार हे संस्काराचे केंद्र झाले पाहिजे- आमदार डॉ.मिलिंद नरोटे -...

बुद्धाचे विहार हे संस्काराचे केंद्र झाले पाहिजे- आमदार डॉ.मिलिंद नरोटे – लालडोंगरी येथे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती लालडोंगरी चे वतीने बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना आज,सोमवार १० फेब्रुवारीला भन्ते बुद्ध ज्योती सुथविरो,श्रमण धम्मविरियो चामोर्शी यांचे हस्ते करण्यात आली.प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे म्हणाले की,तथागत बुद्धाचे विहार हे संस्काराचे,विकासाचे केंद्र झाले पाहिजे,कारण बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे.आपणही विज्ञानातून चंद्राकडे गेलो पाहीजे यातूनच समाजाची प्रगती होते.प्रज्ञा,शील,करुणा प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे.जो शांत व संयम बाळगतो तोच खरा बुध्दाच्या मार्गावर मार्गावरून प्रगतीकडे वाटचाल करतो,असे बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापना प्रसंगी आमदार डॉ.नरोटे बोलत होते.याप्रसंगी माजी आमदार डॉ.देवराव होळी, मानिकराव तुरे,प्रा.मुनिश्वर बोरकर,प्रा.श्याम रामटेके, किशोर उंदिरवाडे,नगर परिषद सदस्य सुमेध तुरे आदींचे बुद्ध धम्माप्रती मार्गदर्शन लाभले.तर भन्ते संघाच्या वतीने प्रवचन पार पडले.दिपप्रज्वलन जयश्री वायललवार यांनी केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे जेष्ठ नेते मानिकराव तुरे,रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य श्याम रामटेके,माजी जि.प सदस्य प्रा.रमेश बारसागडे,मधुकर भांडेकर, न.प.सदस्य सुमेध तुरे, किशोर उंदिरवाडे,रघुनाथ दुधे,सातपूते न.प.सदस्या,भिवापूरे न.प सदस्या,गिता सोरते आदिंची उपस्थिती लाभली होती.सदर कार्यक्रमांचे संचालन गायक विजय शेन्डे यांनी केले.आज रात्रीच्या सुमारास जगदिश गेडाम,प्रकाश बन्सोड यांच्या भिमगितांचा कार्यक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमास समाजाचे अध्यक्षा शालुताई खोब्रागडे,उपाध्यक्ष कल्पना पेंडुकर, सचिव सुमिता सहारे,तुप्ती लाडे,गिता उंदिरवाडे,शेखर साखरे,संतोष उंदिरवाडे,शुभांगी रामटेके,विलास सहारे, कुसुम उंदिरवाडे,शरद रामटेके सहीत आदींनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमास बहुसंख नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!