Friday, June 19, 2026
Homeमुंबईअन्यथा.. 'या' कारणांमुळे लाडक्या बहिणींकडून रक्कम घेणार परत..

अन्यथा.. ‘या’ कारणांमुळे लाडक्या बहिणींकडून रक्कम घेणार परत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल,असे राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.काल मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना लाडकी बहीण योजनेवरील शासनाची भूमिका स्पष्ट केली.खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे,या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार काय? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या,ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला,त्यांच्याकडून पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केले जातील.हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी व विविध योजनांसाठी वापरले जातील.
राज्यातील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत.मात्र,अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत.यावर अदिती तटकरे म्हणाल्या,सरकारची स्वतःची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे.त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत.ज्या महिलांनी निकषांत बसत नसतांनाही या योजनेचा लाभ घेतला,त्यांच्या अर्जाची पडताळणी स्वतंत्र व्यवस्थेद्वारे केली जाईल.
विशेषतः,ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत तसेच,गेल्या पाच महिन्यांत ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे,त्यांची यादीही या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल.त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडूनही पैसे परत घेतले जातील.
मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात २,१०० रुपये जमा होणार असल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात सांगितले.या योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वीपासून मिळणार असून सरकारने त्यासाठी ३,६९० कोटी रुपये महिला व बालविकास
विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!