Friday, June 19, 2026
Homeनागपूरसावधान..! गुगलवरून ऑनलाईन कस्टमर केअर क्रमांक घेणे डॉक्टर महिलेस पडले महागात.. -...

सावधान..! गुगलवरून ऑनलाईन कस्टमर केअर क्रमांक घेणे डॉक्टर महिलेस पडले महागात.. – मोबाईल हॅक करून १३.७५ लाखांचा गंडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- हल्ली ऑनलाईनचा ट्रेण्ड वाढलेला आहे.जो-तो ऑनलाईन खरेदी-विक्री,ऑनलाईन पैसे देणे-घेणे तसेच विविध ऑनलाईन पद्धतींचा वापर करून घरबसल्या तथा चालता-बोलता व्यवहार करू लागले आहेत.त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.असाच काहीसा प्रकार एका महिला डॉक्टर यांच्या बाबतीत घडलेला आहे.नागपूरच्या ‘एम्स’ मधील महिला डॉक्टरला सायबर गुन्हेगारांकडून १३.७५ लाखांचा गंडा घालण्यात आला. इंटरनेटवरून स्टेट बँक ऑफ इंडियाचा कस्टमर केअर क्रमांक घेणे महिलेला महागात पडले.बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे.संबंधित महिला डॉक्टर ‘एम्स’ मध्ये कार्यरत असून त्यांचे निवासस्थान शहराच्या आऊटर भागात आहे.त्यांचे पतीदेखील डॉक्टरच आहेत.२६ डिसेंबर २०२४ रोजी त्या चिंचभुवन येथील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या.त्यांना बँक खात्यातील आठ लाख रुपयांचे पोस्टात फिक्स्ड डिपॉझिट करायचे होते.त्यांना योनो ॲपद्वारे पॉझिटिव्ह पे सिस्टमद्वारे चेक पे चे स्टेटस तपासू शकता,असे सांगण्यात आले.त्या घरी गेल्या व त्यांनी तसा प्रयत्न केला.मात्र त्यांना त्यात यश आले नाही.त्यांनी गूगलवर एसबीआय हेल्पलाईन मिहान याचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना एक टोल फ्री क्रमांक मिळाला,मात्र तो अस्तित्वातच नव्हता.त्यांनी जस्ट डायलवरून शोध घेतला असता त्यांना ९०६२६५९५०३ हा क्रमांक मिळाला.त्यावर त्यांनी फोन केला असता समोरील व्यक्तीने त्याचे नाव राकेश पटेल असे सांगितले.त्याने एसबीआयच्या मिहान शाखेतून बोलत असल्याची बतावणी केली व महिला डॉक्टरच्या व्हॉट्सॲपवर एक एपीके फाईल पाठविली.त्यावर महिलेने क्लिक केले.मात्र,मोबाईल काम करेनासा झाला.त्यामुळे त्यांनी थोडा वेळ दुर्लक्ष केले.एपीके फाईलवर क्लिक केल्यावर मोबाईल हॅक झाला होता व काही वेळासाठी सर्व नियंत्रण आरोपीकडे गेले होते.त्याने तेव्हाच सर्व व्यवहार केले.त्यांच्या बँक खात्यातून १० लाख ९० हजार २९९ रुपये वळते झाले.तर एफडी खात्यावर २.८४ लाखांचे कर्ज घेतल्याचे दिसून आले.बँक खात्यावर शून्य रक्कम दाखवत असल्याने त्यांनी तातडीने बँकेला कळविले व हे व्यवहार केले नसल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांनी पतीला माहिती दिली. आरोपींनी त्यांना १३.७५ लाखांचा गंडा घातला. त्यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!