Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीसाहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'पेरते व्हा' कवितेला पुरस्कार जाहीर...

साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘पेरते व्हा’ कवितेला पुरस्कार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पुणे जिल्ह्याच्या सावंतवाडी येथील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात.यंदा आयोजित करण्यात आलेल्या “ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर,पुणे पुरस्कृत उत्कृष्ट कवितास्पर्धा-२०२४” मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या  “पेरते व्हा” या कवितेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “आरती” मासिकाचे संपादक प्रणव भागवत तथा भारत गावडे यांनी कळविले आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रमाणपत्र व दिवाळी अंक भेट असे असून वरील कविता आरती दिवाळी अंक- २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी याच संस्थेच्या कथा व कविता लेखन स्पर्धेत चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘श्रृंखला’ या कथेस द्वितीय क्रमांकाचे व ‘रानगर्भ फुलत आहे’ या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले होते.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे प्रा.पराग लोणकर (प्रकाशक),डॉ.एस.एन.पठाण,डॉ.परशुराम खुणे,नरेश बावणे उपसंपादक देशोन्नती व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!