Friday, August 7, 2026
Homeमुंबईचोरट्याचा अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरून जीवघेणा हल्ला..

चोरट्याचा अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरून जीवघेणा हल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एकेकाळी सिनेसृष्टीत प्रख्यात असलेला
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांचेवर घरात चोरीसाठी शिरलेल्या चोरट्याने चाकू हल्ला केल्याची घटना आज, गुरुवार १६ जानेवारीला उघडकीस आल्याने सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही मध्यरात्री घडली असून सध्या स्थितीत  सैफ अली खानवर मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
अज्ञात चोट्याने मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास  खिडकीतून घरामध्ये प्रवेश केला.ज्याठिकाणी मुले झोपली होती,त्याच खोलीत चोरटा दिसून आल्याने मुलांनी आरडा ओरड केली.त्यामुळे अभिनेता सैफ अली खान जागा झाला.चोर आणि सैफ अली खान समोरासमोर उभे होऊन टकमक बघू लागले.अशातच चोरीच्या बेताने घरात प्रवेश केलेल्या चोराने अभिनेत्यावर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार केले.यात जखमी झालेल्या सैफ ला ताबडतोब मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.सैफ जखमी झाल्यामुळे त्याला सावरण्यासाठी घरात धावपळ सुरू झाली,या संधीचा फायदा घेत चोराने घरातून पळ काढला.यामध्ये सैफ बराच जखमी सुद्धा झाला आहे. चोराला शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!