Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पन्नासावे व शेवटचे सत्र नुकतेच पार पडले.या स्पर्धेतील सर्व सत्रात सहभागी स्पर्धकांचा आढावा घेण्यात आला व स्पर्धेत नियमितपणे व जास्तीत जास्त सत्रात भाग घेणाऱ्या पाच कवींना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्यात प्रामुख्याने खुशाल म्हशाखेत्री (गडचिरोली),प्रेमिला अलोने (गडचिरोली),अजय राऊत (कवठी,जि.चंद्रपूर),वसंत चापले (गोगाव,जि.गडचिरोली),रेखा दिक्षित (कोल्हापूर) या कवींची निवड करण्यात आली; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार  असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!