- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून फ्री रिचार्ज सह आता नाताळ,नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर लुटारूंकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह,पेटीएम,फोन पे,गुगल पे यांसारख्या बनावट ॲपद्वारेही फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे.काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याने बनावट ॲप व सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सायबर पोलिसांकडे ऑनलाइन फसवणुकीच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असतात.यात आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलिस ठाण्यांपर्यंत येणारे अनेक जण असतात.त्यात सण-उत्सव काळात सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय होत असतात.त्यात आता नाताळ,थर्टी फर्स्ट आणि नववर्षानिमित्ताने सोशल मीडियावर विविध ऑफरसह फ्री गिफ्ट,फ्री रिचार्जचे आमिष दाखवून फसवणकीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अनोळखी लिंकवर क्लिक करू नये; असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमीषाला बळी न पडता सजग राहणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते.ही लिंक डाऊनलोड केल्यास भ्रमणध्वनी,संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवितात.त्याआधारे आर्थिक फसवणूक,माहितीची चोरी,बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे; असेही आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
- Advertisement -

