- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-हल्ली जिकडे पहावे तिकडे ग्रामीण भागातील महिला वर्गांना भुरळ घालून कर्ज पुरवठा करणाऱ्या लहान-सहान वित्तीय संस्था आपल्या जाळ्यात ओढून महिलांना कर्ज देत वारेमाप व्याज वसुली करीत असल्याचे दिसून येत आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन ८ ते १० महिलांचे बचत गट बनवून सुरुवातीला ३० ते ५० हजाराचे कर्ज देतात.नंतर गटांचा सिव्हिल स्कोर चांगला असल्याचे सांगून कर्जाची रक्कम वाढवून देतात.कर्जाची परतफेड दर आठवड्याला करावी लागते.आठवड्याच्या ठराविक दिवशी मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी एका विशिष्ट ठिकाणी घरी येऊन कर्जाची वसुली करतात.त्यामुळे अनेक महिला कर्जबाजारी होत आहेत.ग्रामीण भागातील मजूर महिलांना नियमित मजुरी मिळत नाही. अशावेळी कर्जाचे हप्ते कशी द्यावे, हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो,मात्र मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाची रक्कम ठराविक देणे आवश्यक असते.हप्ता चुकला तर ते भरण्यासाठी महिलांची तारांबळ उडते.बरेचदा अशा महिला खासगी सावकारांचे कर्ज काढून हप्ता भरीत आहेत.त्यामुळे एका कर्जावर दोनदा व्याज भरणा करण्याची वेळ महिलांवर येत असल्याचे चित्र आहे.अशा प्रकारे ग्रामीण भागात रोजीरोटी करणाऱ्या महिलांची लुबाडणूक सुरू आहे.त्यामुळे अशांवर आवर घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
- Advertisement -

