- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सामान्य नागरिकांच्या रेशन कार्डसाठी
शासन स्तरावरून ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.आता यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.३१ डिसेंबरपर्यंत केवायसी न जोडणाऱ्या ग्राहकांचे रेशन बंद करण्यात येणार आहे; असा इशारा प्रशासनाबरोबरच रेशन धान्य दुकानदारांकडून देण्यात येत आहे.केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेशनिंग दुकानात शिधापत्रिकाधारक व कुटुंबीयांची गर्दी होत असतांनाच ई-पॉस मशीनवर बोटांचे ठसे उमटत नसल्याने,बरेच ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांची गैरसोय होत आहे.ज्यांचे हाताचे ठसे ई-पॉस मशीनवर उमटत नाहीत,अशांनी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.त्यामुळे यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांनी केली आहे.
- Advertisement -

