Saturday, September 5, 2026
Homeनंदुरबारअखेर दारूची बाटली झाली 'आडवी'... - गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान झालेले...

अखेर दारूची बाटली झाली ‘आडवी’… – गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान झालेले प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नंदुरबार :-गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान पार पडले.यामध्ये अखेर महिलांचा विजय झाला असून दारुची बाटली आडवी झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील असलोद येथे दारुबंदीसाठी आज रविवारी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा होत्या.त्यावेळी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी असलोद गावात आले होते.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच प्रशासनाने मतमोजणीला सुरूवात केली.बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात ६७७ पैकी ६१२ महिलांनी दारुबंदीसाठी कौल दिला.त्यामुळे या गावात आता दारुबंदी होणार हे स्पष्ट झाले आहे.
एकूण १२१६ पैकी ६७७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यापैकी ६१२ महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारुबंदीच्या बाजूने मतदान केले.तर ४९ महिलांनी उभी बाटली म्हणजे दारुबंदीच्या विरोधात मतदान केले.त्यानंतर मतमोजणीमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दारुबंदीच्या बाजूने महिलांनी कौल दिल्याने गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!