Thursday, April 30, 2026
Homeनंदुरबारगावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान... -मतदान चिन्ह म्हणून आडवी बाटली व उभी...

गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान… -मतदान चिन्ह म्हणून आडवी बाटली व उभी बाटली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नंदुरबार :-दारूमुळे गावातील अनेकजण व्यसनाच्या आहारी जाऊन,कित्तेकांची संसारे उघड्यावर पडून उद्ध्वस्त झाली आहेत.त्यामुळे गावात सुरू असलेली दारू बंद करण्यात यावी; यासाठी गावकरी,महिला वर्ग अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र,दारूबंदी होण्याचे नावच घेत नसल्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्वानुमते मतदान करण्याचे ठरले.त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज,रविवारी ८ डिसेंबरला गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर महिलांचे मतदानास सुरुवात झाली.सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली व उभी बाटली मतदान चिन्ह आहेत.गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावातील १२६० महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याचे तहसीलदार गिरासे यांनी कळविले.
गावात दारूबंदीच्या मागणीसाठी गावकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र,दारूबंदी होत नसल्याने गावात दारूबंदी करण्यासाठी महिला एकटवल्या.सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती.अखेर प्रशासनाने मागणी मंजूर केली व मतदान घेण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!