- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रक्षकच जेव्हा भक्षक बनत असेल तर या जगात विश्वास कुणावर ठेवायचा.एका ५२ वर्षीय पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल,सोमवारी २ डिसेंबरला अत्याचार कायद्यान्वये हवालदारावर गडचिरोली पोलिस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत बंडू गेडाम वय ५२ वर्षे,रा.नवेगाव ता.गडचिरोली याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.मुलीने गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि अजय जगताप यांच्याकडे घडलेल्या प्रकरणाचा उलगडा केला.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीतीलच कर्मचाऱ्याने असे कृत्य करणे हे अशोभनीय असल्याने काल सोमवारी सायंकाळी बंडू गेडामविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- Advertisement -

