Monday, July 13, 2026
Homeगोंदियादारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या पोटच्या मुलाने आईलाच केले ठार...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या पोटच्या मुलाने आईलाच केले ठार व स्वतःही केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या पोटच्या मुलाने आईलाच कुन्हाडीने डोक्यात घाव घालून ठार केले.मात्र,आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतः घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला-कावराबांध येथे शुक्रवारी १५ नोव्हेंबरला घडली. सुलकन फत्तेलाल बनोठे वय ७५ वर्षे असे मृत आईचे नाव असून लेखराज फत्तेलाल बनोठे वय ५४ वर्षे असे आरोपी व आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
आरोपी लेखराज बनोठे हा व्यवसायाने अभियंता होता; परंतु व्यसनामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. लेखराजला चार भावंडे असून,यातील लोकेश या भावाचा आधीच मृत्यू झाला आहे.त्याच्या वडिलाचा सन २००७ मृत्यू झाला.आईला मिळणाऱ्या पेन्शन व शेतीच्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. सुलकनसोबत त्यांचा धाकटा मुलगा गजेंद्र वय ३४ वर्षे आपल्या कुटुंबासह व आरोपी लेखराज राहत होता. तर लोकेशच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय व मुलगा विजय बनोठे याचे कुटुंबीय गोंदिया येथे राहतात. लेखराजच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी व मुले त्याला सोडून गेली आहेत.
शुक्रवारी लेखराजने आई सुलकन यांना दारूसाठी पैसे मागितले.मात्र,तिने पैसे दिले नाही; यावरून रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार केले.आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव होताच त्याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.गजेंद्र बनोठे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक नागदिवे करीत आहेत.
लेखराज बनोठे याने बीई (सिव्हिल इंजिनिअर) शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली,पुणे,हैदराबाद अशा अनेक ठिकाणी नोकरी केली.लेखराजच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्याची पत्नी रेणुका बनोठे, मुलगा विवेक आणि मुलगी शुभांगी हे त्याला मागील २० वर्षापूर्वी सोडून गेलीत असून,नागपूर येथे राहतात. तेव्हापासून लेखराज आईसह राहत होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!