Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्य सरकारला सरपंचाने भिकेचा कटोरा घेऊन बाबूंसमोर जावे असे वाटते का?... -...

राज्य सरकारला सरपंचाने भिकेचा कटोरा घेऊन बाबूंसमोर जावे असे वाटते का?… – सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एक लाख रुपयांचा ठोठावला दंड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमधील दुर्गम गावातील निवडून आलेल्या महिला सरपंचाला अयोग्य कारणांसाठी काढून टाकल्याबद्दल राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की,राज्य सरकारला सरपंचाने भिकेचा कटोरा घेऊन बाबूंसमोर (नोकरशहा) जावे असे वाटते का?. जशपूर जिल्ह्यातील एका गावातील महिला सरपंच सोनम लकडा यांच्या मानसिक छळाबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे; जो चार आठवड्यांत भरायचा आहे.खंडपीठाने म्हटले आहे की,छत्तीसगडमधील दुर्गम भागात आपल्या गावाची सेवा करण्याचा विचार करणाऱ्या एका निवडून आलेल्या सरपंचाला,तरुणीला काढून टाकण्यात अधिकाऱ्यांची मनमानी कारणीभूत आहे. त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक करण्याऐवजी किंवा त्यांना सहकार्य करण्याऐवजी किंवा गावाच्या विकासासाठी त्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्याऐवजी त्यांना अन्यायकारक वागणूक देण्यात आली हे चुकीचे आहे; असे खंडपीठाने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!