Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीलागोपाठ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा... - उद्याला राहुल...

लागोपाठ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा… – उद्याला राहुल गांधी यांची चिमूर येथे सभा तर १७ तारखेला प्रियंका गांधी देसाईगंज शहरात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीभूमी चिमूर येथे उद्या,शनिवार दिनांक-१६ नोव्हेंबरला सेंट क्लारेट शाळेजवळ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी तर अतिदुर्गम,आदिवासी बहुल अशा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा)येथे येत्या रविवारी १७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा होत आहे.
सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महत्त्वाचे नेते,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे नेते,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उमेदवार,पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.जाहीर सभेस जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.प्रियांका गांधी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरात येत आहेत.तर राहुल गांधी हे एकदा चंद्रपूरात आले होते.यानंतर चिमूरात मात्र,ते पहिल्यांदाच येत आहेत.या दोन्ही नेत्यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!