Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारतात आता समान नागरी कायद्या लवकरच- नरेंद्र मोदी

भारतात आता समान नागरी कायद्या लवकरच- नरेंद्र मोदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आम्ही ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर काम करत आहोत.याला लवकरच मंजुरी दिली जाईल.या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल.तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल,याशिवाय भारत आता समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे; हा कायदा लवकरच आणला जाईल,असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’प्रसंगी केले.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.यादरम्यान त्यांनी गुरुवारी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.दरवर्षी ३१ ऑक्टोंबर रोजी पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.त्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व देशवासीयांना ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या शुभेच्छा दिल्या. एकतानगरमध्ये त्यांनी २८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे.आज एकीकडे आपण एकात्मतेचा उत्सव साजरा करत आहोत; तर दुसरीकडे दिवाळीचा सण आहे,याचा मोदी यांनी उल्लेख केला.ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत भारताने विविधतेत एकात्मतेने जगण्याच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे.आज जगभरात एक राष्ट्र,एक ओळख म्हणजेच आधारची चर्चा होत आहे.आम्ही एक राष्ट्र,एक कर प्रणाली तयार केली.वन नेशन,वन ग्रीड ही संकल्पना पूर्ण केली. आयुष्मान भारताच्या रूपाने देशाला वन नेशन,वन इन्शुरन्सची सुविधा दिली आहे.आता आम्ही वन नेशन,वन इलेक्शनवर काम करत आहोत.यामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल.यामुळे भारत विकास आणि समृद्धीचा नवा वेग गाठेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!