Saturday, May 2, 2026
Homeनागपूरशेतीचे नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम... - दोन तलाठ्यांनी १ कोटी...

शेतीचे नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम… – दोन तलाठ्यांनी १ कोटी रुपयांच्यावर केला घोटाळा.. – हायकोर्टाने जामीन फेटाळला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी भरपाई घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या दोन तलाठ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला.न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
अनंता श्रीराम माठे व उमेश गजानन बिल्लेवार,अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणात तहसीलदार शीतल सोलाट यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.आरोपींनी १ कोटी ९७ लाख १९ हजार ३३७ रुपयांचा घोटाळा केला आहे.हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.सार्वजनिक निधीत गैरव्यवहार
करण्यात आला आहे.त्यामुळे प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.करिता आरोपींना जामीन दिला जाऊ शकत नाही; असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.२७ जून २०२३ रोजी राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.करिता सरकारने त्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तलाठ्यांना नुकसानीचा पंचनामा करून अहवाल द्यायचा होता.या आरोपींनी भरपाईत घोटाळा करण्यासाठी अपात्र शेतकऱ्यांची नावे रेकॉर्डवर टाकली असल्याचा प्रकार उजेडात आला.त्यामुळे प्रकरण चांगलेच गाजले.सरकारच्या वतीने ॲड.हर्षल दुबे व ॲड.के.आर.लुले यांनी कामकाज पाहिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!