Saturday, May 2, 2026
Homeगोंदियाचिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास २० वर्षे सश्रम कारावास...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास २० वर्षे सश्रम कारावास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-नात्यात भाची लागणाऱ्या पाच वर्षाच्या
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधम मामाला गोंदियाच्या प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज,सोमवारी २१ ऑक्टोंबरला २० वर्षे सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.तौसिफ शेख वय २३ वर्षे,ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नराधम मामाचे नाव आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत आरोपी तौसिफ शेख ईसाख शेख हा नात्यात पिडीत चिमूकलीचा मामा लागत असून घटनेच्या दिवशी १५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पिडीत चिमुकली ही अंगणवाडीतून घरी परत आल्यानंतर तौसिफच्या घरी गेली.यावेळी आरोपी तौसिफ हा आंघोळ करित होता. दरम्यान,ती त्याच्या जवळ गेली असता त्याने तिला आंघोळ करून देण्याच्या नावावर तिच्या अंगावरील कपडे काढून आंघोळ घातली.दरम्यान तिच्या गुप्तांगाला स्पर्श करत लैंगिक अत्याचार केला यानंतर आरोपीने या बद्दल जर कोणाला सांगितले त पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान,तिची आई दुपारी शेतातून घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार व तिच्या मामाने दिलेल्या धमकीविषयी आपल्या आईला सांगितले.यावरून पिडितेच्या आईने १७ सप्टेंबर २०२२ रोजी केशोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द तकार दाखल केली होती.याप्रकरणी केशोरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला.गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक संदिप इंगळे यांनी करून आरोपीविरूध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पिडित पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वसंतकुमार चुटे व कृष्णा डी.पारधी यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.आरोपीचे वकील व पिडितेतर्फे सरकारी वकील वसंतकुमार चुटे यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी.वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी तौसिफ शेख ईसाख शेख वय २३ वर्षे,रा.ता अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया यास २० वर्षाचा सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.या प्रकरणी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक गणेश वनारे यांचे देखरेखीत,पोलीस पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे पोलीस ठाणे केशोरी यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!