Sunday, April 19, 2026
Homeगोंदियाविद्युत खांबावरील होर्डिंग काढतांना विद्युतच धक्का लागून युवकाचा मृत्यू…

विद्युत खांबावरील होर्डिंग काढतांना विद्युतच धक्का लागून युवकाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात येतात.प्रसंगी कारवाईही करण्यात येते.मात्र हा प्रकार अद्यापही थांबलेला नाही.अशातच १८ जून च्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असतांना विद्युत धक्का लागून युवकचा मृत्यू झाला. आकाश नागरीकर असे मृत युवकाचे नाव आहे.

सविस्तर असे की,मागील काही वर्षापासून प्रचार व प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावल्या जात आहेत.होर्डिंग लावतांना प्रशासकीय यंत्रणेकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे.त्यातच होर्डिंगचे कंत्राट अनेक ठिकाणी यंत्रणेकडून एजंसीला देण्यात आले आहे.त्या एसेंजीच्या माध्यमातूनच होर्डिंग लावण्याचे काम होत असते.मात्र या व्यतिरिक्तही अवैधरित्या होर्डिंग लावण्यात येत असतात.पालिका प्रशासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.मात्र हा प्रकार थांबलेला नाही. मुंबई येथील प्रकरण गाजल्यानंतर यात सुधारणा होईल असे वाटले होते.मात्र गोंदिया शहरात १८ जूनच्या रात्री एका विद्युत खांबावरील होर्डिंग काढतांना युवकाला आपला जीव गमवावा लागला. 

विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असतांना विद्युतच शॉक लागून आकाशचा मृत्यू झाला.कुटुंबातील कमावता व्यक्ती गमावल्याने कुटुंबियावर आभाळ कोसळण्यासारखेच झाले.मागील काही वर्षापासून गोंदिया विधानसभा समुहाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात येते.त्याअनुषंगाने मृतक आकशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात दानदात्यांनी मदत केली. ही मदत समुहाच्या माध्यमातून आकाशच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!