Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोली'या' योजने अंतर्गत घरकुलासाठी करा १० जुलै पर्यंत अर्ज…-इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या...

‘या’ योजने अंतर्गत घरकुलासाठी करा १० जुलै पर्यंत अर्ज…-इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यशासनाने मोदी आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना १० जुलैपर्यंत अर्ज येणार आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी घरकुल राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ,दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रतिघरकुल १ लाख ३० हजार रुपये व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रतिघरकुल १ लाख २० हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.या योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थ्यांची निवड करून निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास यांच्यामार्फत करण्यात येईल.

लाभार्थी पात्रतेचे हे आहेत निकष 👇

लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.अथवा त्यांचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण,गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनःश्च योजनेचा लाभघेण्यास पात्र असणार नाही.लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

ही कागदपत्रेआवश्यक 👇

कागदपत्रे सातबारा उतारा,मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र,सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र,आधारकार्ड,रेशन कार्ड,निवडणूक ओळखपत्र,विद्युत बिल,मनरेगा जॉब कार्ड, लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!