Friday, May 1, 2026
Homeनागपूरबांधकाम ठेकेदार आर्थिक अडचणीत; हजारो कोटींची बिले सरकारकडे प्रलंबित..!

बांधकाम ठेकेदार आर्थिक अडचणीत; हजारो कोटींची बिले सरकारकडे प्रलंबित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
नागपूर :-शासनाकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामे करवून घेण्यात आलीत.यासाठी ठेकेदारांनी  कामाच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवलेल्या आहेत.बांधकाम व इतर कामे करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे.शासनाकडे हजारो कोटींची रक्कम थकीत असल्याने व्यवसाय  करायचा कसा? व बँकांचे कर्ज भरायचे कसे? असा प्रश्न आमच्या समोर उभा येऊन ठाकला असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बुटीबोरी शाखेचे अध्यक्ष नितीन साळवे यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात आलेल्या कामांचे ४६ हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभागाचे ८ हजार कोटी रुपये, जलजीवन मिशन योजनेतील कामांचे १८ हजार कोटी रुपये, जलसंपदा विभागाचे १९ हजार ७०० कोटी रुपये तर नगरविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे १७ हजार कोटी रुपयांची बिले(देयक)राज्य सरकारकडे तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत.लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च होत असल्याने सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आहे.अशातच आता बांधकाम ठेकेदारांची (कंत्राटदार) हजारो कोटींची रक्कम शासनाकडे प्रलंबित असल्याने  बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांच्या कामाना मंजुरी दिली.कार्यारंभ आदेश मिळताच ठेकेदारांनीही जलद बिले मिळावीत म्हणून गतीने कामे केली. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले.त्यातील सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाचीच आहेत. त्याखालोखाल जलजीवन मिशन,पाणीपुरवठा विभागाची आहेत.कंत्राटदारांना आता बँका आणि जीएसटी विभागाकडून नोटीस बजावल्या जात आहेत.याआधी असे कधी घडत नव्हते.देणी सहा ते सात महिन्यांत मिळत होती. परंतु,आता तीन वर्षांपासूनची देणी थकीत आहेत.यातच आता दीड लाख कोटी रुपयांची कामे सरकारने काढली आहेत.आधीचेच पैसे मिळालेले नाहीत.त्यात नवीन कामे प्रस्तावित करण्यात आल्याने अडचणी वाढणार आहेत.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून सरकारकडे थकीत रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे.मात्र,शासनाकडून रक्कम मिळत नसल्याने अनेक कामे बंद होऊन हजारो कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!