Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी..

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यातच घरकुल बांधकामासाठी शासन स्तरावरून तुटपुंजे अनुदान दिले जात आहे.वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान ३ लाखांपर्यंत वाढ करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी
केली.यासोबतच केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहोचले नाहीत.ज्या गावात नळ पोहोचले,त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहोचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल,याकरिता प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीबहुल असून आदिवासींचे जल,जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्यासाठी पेसा कायदा तयार करण्यात आला.मात्र,प्रशासनाकडून यामध्ये ढवळाढवळ केली जाते,हे योग्य नसल्याची भावना खासदार किरसान यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरू असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे प्रसंगी ते बोलत होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!