Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                                       

गडचिरोली :- समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या अंतर्गत असलेल्या  भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार कृष्णा गजबे,आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना,सहाय्यक आयुक्त सचिन मडावी,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,लीलाधर भरडकर तसेच इतर वसतिगृहाचे विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.

समाज कल्याण विभागाचे जिल्ह्यात १० वसतिगृह निवासी शाळा असून त्यापैकी ८ शासकीय इमारतींमध्ये आहेत.आता या वसतिगृहाचे भूमिपूजन झाल्याने पुढील वर्षभरात विद्यार्थिनी नवीन इमारतीत राहू शकणार आहेत.गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थिनीं साठी खूप मोठी सोय होणार आहे.कामाची गुणवत्ता आणि इमारत बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे; अशा सूचना बांधकाम विभागास देण्यात आले.यावेळी  बहुजन कल्याण विभागामार्फत NEET,JEE ची तय्यारी करणाऱ्या मुला-मुलींना मोफत शैक्षणिक टॅब, ६ GB डाटा असे साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी ना.आत्राम म्हणाले,मुला-मुलींनी टॅबचा चांगला वापर करुन खूप काही याच्यातून शिकता येईल,तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात नवीन वस्तीगृह बांधण्यात येतील; अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!