उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले असल्याने नक्षली संघटनेला मोठा हादरा बसला आहे.यातील १९ नक्षलवाद्यांपैकी ९ नक्षलवाद्यांवर शासनाने २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले की,सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे, यामध्ये छावण्या उभारणे याचा समावेश आहे.आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी आंध्र-ओडिशा बॉर्डर विभाग आणि माओवाद्यांच्या पामेड एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय होते.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी देवा पदम वय ३० वर्षे आणि त्याची पत्नी दुले कलामू वय २८ वर्षे हे बटालियन क्रमांक- १ चे वरिष्ठ सदस्य म्हणून सक्रिय होते.शासनाने त्यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अशातच एरिया कमिटी सदस्य सुरेश कट्टम वय २१ वर्षे याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते,तर आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते.तर इतर पाच नक्षलींवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

