Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीदारू ढोसून शिक्षक पोहचला शाळेत; गावातील सरपंचासह शाळा समितीने केली तक्रार…-गडचिरोली सीईओ...

दारू ढोसून शिक्षक पोहचला शाळेत; गावातील सरपंचासह शाळा समितीने केली तक्रार…-गडचिरोली सीईओ ने प्रकरणाची दखल घेत शिक्षकास केले निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे.कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते.आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे; यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते.आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचे ज्ञान होते. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी,दिलेली शिकवण,अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात.लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.आई-वडिलां नंतर शिक्षकाला गुरुचा दर्जा तर शाळांना विद्या मंदिर म्हटले जाते.अशा पवित्रस्थळी विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा शिक्षकच जर दारू पिऊन शाळेत येत असेल तर विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार? असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी दिनांक- १२ जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील कसनसूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत उघडकीस आला.येथील एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत पोहोचला.याची तक्रार सरपंच व शाळा समितीने गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्याकडे केली.सीईओंनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत शिक्षकाला तत्काळ निलंबित केले.जीवनदास गोमा आत्राम,असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,कसनसूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात.शाळेत जीवनदास आत्राम नावाचे शिक्षक कार्यरत आहेत.शुक्रवारी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक आत्राम दारूच्या नशेत शाळेत पोहोचले.या प्रकरणाची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकारीही शाळेत पोहोचले.दारू पिऊन शाळेत येणाऱ्या शिक्षक आत्राम यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी थेट सरपंचामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.ही बाब गांभीर्याने घेत सीईओ सिंह यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना कसनसूरच्या जि.प.शाळेत चौकशीसाठी पाठवले.अधिकाऱ्यांना शिक्षक आत्राम दारूच्या नशेत आढळून आले.शिक्षण अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सीईओ सिंह यांनी शिक्षक आत्राम यांना तात्काळ निलंबित केले.त्यांच्याविरुद्ध कसनसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!