Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीचिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात डॉ.रमेश गजबे किंवा प्रा.राम मडावी मैदानात उतरणार…-उमेदवारी कोणाच्या...

चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात डॉ.रमेश गजबे किंवा प्रा.राम मडावी मैदानात उतरणार…-उमेदवारी कोणाच्या पथ्यावर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/ मुनिश्वर बोरकर

गडचिरोली :- चिमुर-गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी चिमुरचे डॉ.रमेश गजबे मैदानात उतरणार असल्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना घाम फोडणार आहेत हे येणारा काळच सांगेल.सन २०१९ च्या चिमुर लोकसभा निवडणुकीत ते वंचित (प्रकाश आंबेडकर ) यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे होते. त्यामुळे त्यांना बहुजनांच्या मतदारांनी साथ दिल्यामुळे त्यांनी १ लाख ११ हजार मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर होते.कांग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी ७० हजार मतानी पडले.हिच बहुजनांची मते डॉ.उसेंडी यांना मिळाली असती तर डॉ.नामदेव उसेंडी यांचा विजय नक्की होता.परंतु घडले उलटेच डॉ.रमेश गजबे यांना मिळालेली सव्वालाख मते भाजपाचेअशोक नेते यांच्या पथ्यावर पडली व भाजपाचे अशोक नेते निवडुन आलेत.सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित (प्रकाश आंबेडकर )संध्यातरी इंडिआ आघाडी सोबत आहेत. वंचित इंडिआ आघाडी सोबत राहील्यास डॉ.रमेश गजबे हे अपक्ष उमेदवार म्हणुन लढवू शकतात.किंवा वंचित प्रा.राम मडावी शिंदेवाही यांना मैदानात उतरविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.प्रा.राम मडावी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात वंचितचे उमेदवार म्हणुन उभे होते. त्यांना १ लाख मते मिळाली होती.उद्या वंचित इंडिआ आघाडीतून बाहेर पडली.सध्यातरी वंचित बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे.तेव्हा चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी वंचित डॉ.रमेश गजबे किंवा प्रा.राम मडावी यांनाच देणार दुसरा पर्यायही नाही. आणि असे जर झाले तर डॉ.रमेश गजबे किंवा प्रा. राम मडावी ची उमेदवारी कांग्रेसच्या उमेदवारांना घाम फोडू शकते.कांग्रेसचे डॉ.नामदेवराव किरसान हे रिपब्लिकन पार्टी च्या छोट्या-मोठ्या पार्टीच्या स्थानिक नेत्याच्या संर्पकात आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!