Monday, July 13, 2026
Homeनागपूरगाय आडवी आली आणि चालकाने ब्रेक दाबला; तीन वाहने एकमेकांवर आदळली... -भाजपचे...

गाय आडवी आली आणि चालकाने ब्रेक दाबला; तीन वाहने एकमेकांवर आदळली… -भाजपचे चार कार्यकर्ते जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनाला गाय आडवी आली आणि चालकाने ब्रेक दाबले.त्यातच मागून वेगात येत असलेल्या वाहनांपैकी तीन वाहने एकापाठोपाठ एक समोरच्या वाहनांवर आदळली.या अपघातात चार कार्यकर्ते जखमी झाले.सदरची घटना सावनेर शहरालगत कळमेश्वर-सावनेर बायपास रोडवर काल, मंगळवारी २९ ऑक्टोंबरच्या सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत ठाकरे,प्रमोद ढोले,प्रमोद गोलाईत व प्रकाश ठाकरे सर्व रा.सावनेर अशी जखमी कार्यकर्त्यांची नावे आहेत. भाजपचे उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांनी काल मंगळवारी सावनेर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.शक्ती प्रदर्शनासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सावनेर शहरात बोलावले होते.आशिष देशमुख यांचे वाहन सर्वात समोर होते तर कार्यकर्त्यांची वाहने त्यांच्या मागे एकापठोपाठ एक वेगात कळमेश्वरहून सावनेरच्या दिशेने येत होती.या ताफ्यातील एका वाहनाला गाय आडवी आल्याने चालकाने वाहनाने ब्रेक दाबले. क्षणात एमएच- ४०/सीएच-५९९९ क्रमांकाची ह्युंदई कार,एमएच-४०/सीएक्स-१७१० क्रमांकाची स्कॉर्पिओ,एमएच- ४०/सीएक्स-००७२ इनोव्हा व एमएच-४०/एसी-८५२४ क्रमांकाची वॅगन आर ही वाहने एकमेकांवर आदळली. यात चौघे जखमी झाले.माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांनी घटनास्थळ गाठून चारही जखमींना हितेश बन्सोड यांच्या मदतीने सावनेर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!