Friday, June 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान..-एकूण ११ लाख ६२ हजार ४३४ मतदारांनी...

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान..-एकूण ११ लाख ६२ हजार ४३४ मतदारांनी केले मतदान….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण ७१.८८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात ६९.२५ टक्के,आरमोरी ७३.६९ टक्के, गडचिरोली ७१.४२ टक्के,अहेरी ६६.९३ टक्के, ब्रम्हपुरी ७५.१० टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ७४.४१ टक्के मतदान झाले. 

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार ७०२ मतदार आहेत.यात ८ लक्ष १४ हजार ७६३ पुरुष मतदार, ८ लक्ष २ हजार ४३४ स्त्री मतदार तर १० इतर मतदार आहेत.यापैकी ५ लक्ष ९५ हजार २७२ पुरुष मतदारांनी (७३.०६ टक्के),५ लक्ष ६७ हजार १५७ स्त्री मतदारांनी (७०.६८ टक्के) तर ५ इतर नागरिक असे ११ लक्ष ६२ हजार ४३४ (७१.८८ टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नवीन रेल्वे लाईन कामाच्या दृष्टीने दोन दिवस मेमू पॅसेंजर गाड्या राहणार रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे येत्या,रविवार ७ जून...

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता...

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!