Monday, July 13, 2026
Homeनागपूरखाद्य तेलाचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले..

खाद्य तेलाचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आखाती देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून,त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत आहे.नागपूरच्या बाजारपेठेत सोयाबीन,सूर्यफूल,मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किंमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.हे युद्ध पुढील १५ दिवस असेच सुरू राहिले,तर खाद्यतेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नागपुरात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेल १५ दिवसांत प्रतिकिलो २० रुपयांनी महागले.भारतात सूर्यफूल आणि पाम तेलाची मोठी आयात रशिया,युक्रेन,मलेशिया आणि इंडोनिशिया सारख्या देशांतून होते.मात्र,युद्धामुळे जहाजांची ये-जा थांबली असून आयातीवर मर्यादा आल्या आहेत.यामुळे सोयाबीन व सूर्यफूल या तेलांच्या टिनाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.तसेच हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या मका व पाम या तेलांच्या आवकीतही घट झाली आहे.आधीच डाळी आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेल्या गृहिणींच्या अडचणीत आता तेलाच्या दरवाढीने भर टाकली आहे.आधीच महागाई शिगेला पोहोचली आहे,त्यात आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिनाभराचे नियोजन कसे करावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.व्यापाऱ्यांच्या मते,युद्ध स्थिती पुढील दोन आठवड्यात निवळली नाही,तर कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प होईल.अशा स्थितीत खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर १५ ते २० रुपयांनी आणखी वाढू शकतात.१५ दिवसांआधी सोयाबीनचे तेल १४६ रुपये किलो होते,तर आता १६६ रुपये प्रति किलो झाले आहे.अश्याच प्रकारे शेंगदाणा १८० वरून १९० रुपये,सूर्यफूल १७० वरून १९०,मोहरी १६० वरून १८०,पाम तेल १४५ वरून १६०,जवस तेल १६५ वरून १८० रुपये तर खोबरेल तेल ४४० वरून ४५० रुपये प्रति किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!