Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकाय सांगता..? येत्या २६ ऑगस्टला होणार शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार..!

काय सांगता..? येत्या २६ ऑगस्टला होणार शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात येत्या,बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती सणाच्या उत्सवास प्रारंभ होत आहे.उत्सवाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भेडसावू नये,याकरीता शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पागाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.घेण्यात आलेल्या निर्णयात १ सप्टेंबर रोजी होणारे अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन(पगार) हे येत्या,मंगळवार २६ ऑगस्ट रोजी देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.यात जिल्हा परिषद,मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,अकृषि विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक,कुटुंब निवृत वेतनधारक यांनाही सदरचा निर्णय लागू राहणार असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल पाच दिवस आधीच पगार मिळणार आहे.याबाबत शासनाच्या वित्त विभागाकडून आज,गुरुवार २१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!