Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून चार महत्त्वाचे बदल; गॅस दरवाढ, सिमकार्ड,रेल्वे ॲप आणि विमान प्रवास महाग..

आजपासून चार महत्त्वाचे बदल; गॅस दरवाढ, सिमकार्ड,रेल्वे ॲप आणि विमान प्रवास महाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारत देशात आज,रविवार १ मार्च २०२६ पासून अनेक महत्त्वाच्या नियमांत बदलणार करण्यात आले आहेत.ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होईल. सुरक्षितता वाढविणे आणि सेवा सुधारणेच्या उद्देशाने हे सर्व बदल अंमलात आणले जात आहेत.यात आजपासून मेसेजिंग ॲप्ससाठी ‘सिम-बाइंडिंग’ नियम लागू झाले आहेत. सरकारच्या या नियमानंतर आता व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नलसारखे मॅसेजिंग ॲप्स तेव्हाच काम करतील,जेव्हा फोनमध्ये तेच सिम कार्ड ॲक्टिव्ह मोडमध्ये असेल ज्यावरून अकाउंट तयार केले आहे. याशिवाय,जर तुम्ही कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲपसारखे ॲप्स वापरत असाल,तर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील सहा तासांत लॉगआउट होईल.आधी हे एकदा लॉगिन केल्यावर आठवडाभर चालायचे.अनेकदा सायबर गुन्हेगार सिम काढून केवळ वाय-फायच्या माध्यमातून मॅसेजिंग ॲप्स वापरून फसवणूक करत होते.आता सिम काढताच ॲप आपोआप लॉगआउट होईल.यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल.
आजपासून १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ३१ रुपयांपर्यंत महाग झाला आहे.सर्वाधिक वाढ ही कोलकाता येथे झाली आहे,जिथे आता सिलेंडरसाठी
१ हजार ८७५.५० रुपये द्यावे लागतील.तर दिल्लीत किंमत २८ रुपयांनी वाढून  १ हजार ७६८.५० रुपये  झाली आहे.आधी तो १ हजार ७४०.५० रुपयांत  मिळत होता.महत्वाचे म्हणजे,विविध शहरात सिलिंडरच्या किंमती वेगवेगळ्या राहू शकतात.
रेल्वेचे जुने अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजेच UTS ॲप आजपासून पूर्णपणे बंद करण्यात येईल.आता जनरल,प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनची तिकिटे बुक करण्यासाठी प्रवाशांना नवीन ‘Rail One’ ॲपचा वापर करावा लागेल.रेलवन ॲप जुलै २०२५ मध्ये लॉन्च करण्यात आले होते.हे ॲप बंद झाल्यानंतर अनेक प्रवाशांच्या मनात प्रश्न आहे की त्यांच्या UTS ॲपच्या वॉलेटमध्ये (R-Wallet)जमा पैशांचे काय होईल.रेल्वेने सांगितले की तुमच्या वॉलेटमधील रक्कम सुरक्षित आहे आणि ती नवीन रेल्वेवन ॲपमध्ये हस्तांतरित केली जाईल.तथापि,यासाठी एक महत्त्वाची अट आहे.रेलवन ॲपची नोंदणी त्याच मोबाईल नंबरने करावी लागेल, ज्याने यूटीएस ॲपची नोंदणी केली होती.जर मोबाईल नंबर तोच राहिला तर,शिल्लक आपोआप नवीन ॲपमध्ये दिसेल.
विमान प्रवास महाग होऊ शकतो,एटीएफ चे दर ५ हजार ५०० पर्यंत वाढले.ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी विमान इंधनाच्या(एटीएफ)किंमती ५ हजार ५०० पर्यंत वाढवल्या आहेत.यामुळे येत्या काही दिवसांत विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे.मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर असून यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!