Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअधिकृत सूचना नसतांना शाळेने सुट्टी जाहीर केली कशी?-सरकारने विचारला जाब…

अधिकृत सूचना नसतांना शाळेने सुट्टी जाहीर केली कशी?-सरकारने विचारला जाब…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला सुटी देणे केरळमधील एका शाळेला महागात पडले. राज्याच्या सीपीएम सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. तसेच या संदर्भात २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.विशेष म्हणजे डाव्या सरकारने केरळमधील शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली नव्हती.या प्रकरणात राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील कुडलू येथील श्रीगोपालकृष्ण हायस्कूलने विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली होती.यानंतर मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी याप्रकरणी कारवाई करत सार्वजनिक शिक्षण महासंचालकांकडून अहवाल मागवला आहे.अधिकृत सूचना नसताना शाळेने सुटी कशी जाहीर केली,याची उत्तरे मागविण्यात आली आहेत.शिवनकुट्टी यांनी सार्वजनिक शिक्षण संचालकांना २४ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत शाळा प्रशासनाने अर्ज केला असला तरी त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली नसल्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!