Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर अजित पवार चिरनिद्रेत विसावले.. - अंत्यसंस्काराला आबालवृद्धांपासून असंख्य जनसमुदाय..

अखेर अजित पवार चिरनिद्रेत विसावले.. – अंत्यसंस्काराला आबालवृद्धांपासून असंख्य जनसमुदाय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बुधवारी सकाळच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले.ते मुंबईहून पुण्याच्या बारामती येथे  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते.पण,विमानतळ धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळले आणि महाराष्ट्राचा एक कर्तबगार राजकारणी जागेवरच काळाच्या पडद्याआड गेला.दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचे निधन झाले.त्यानंतर,आज,गुरुवार २९ जानेवारी रोजी अजित पवारांचे पार्थीव प्रथम काटेवाडी या त्यांच्या मूळगावी नेण्यात आले.तेथून ते बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात असंख्य भावभावनांच्या हृदयी फुंकाराणे
अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले.पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला.यावेळी ‘अजित पवार अमर रहे’, ‘अजितदादा परत’, ‘एकच वादा अजितदादा’ या अशा विविध घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात एक चबुतरा उभारण्यात आला होता. या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.त्याच्या शेजारील मंडपात शरद पवार,सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजप अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री छगन भुजबळ,हसन मुश्रीफ,शाहू महाराज छत्रपती, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!