Friday, June 19, 2026
Homeगडचिरोली६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री वयोश्री योजना'…-गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऑफलाईन...

६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’…-गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.

सन २०२४-२५ या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.तरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता लाभार्थ्यांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावे. आधार कार्ड/ मतदान कार्ड,राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेराक्स (आधार संलग्न),पासपोर्ट आकाराचे दोन फोटो,स्वयं घोषणापत्र,शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे,इत्यादी कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन एल.आय.सी.ऑफीस रोड,गडचिरोली या कार्यालयात सादर करावे; असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!