Monday, May 18, 2026
Homeगडचिरोली४८५ नवउद्योजकांची कर्ज प्रकरणे मंजूर...

४८५ नवउद्योजकांची कर्ज प्रकरणे मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी बजावत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली असून जिल्ह्यातील ४८५ नवउद्योजकांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,या नवउद्योजकांना वित्तपुरवठा करण्यात आला असून त्यांना अनुदान (सबसिडी) देखील मिळवून देण्यात जिल्हा अग्रेसर ठरला आहे.विविध बँकांनी या योजनेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला असून बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येकी १२९ प्रकरणे,बँक ऑफ इंडियाने ८६,विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६४ आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५२ प्रकरणांना मंजुरी दिली आहे.
जिल्हाधिकारी पंडा यांनी नियमितपणे बैठका घेऊन योजनेची प्रगती तपासली.बँकांनी देखील त्यांना दिलेल्या उद्दिष्टांचे वेळेत पालन करीत सहकार्य केले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले व आगामी काळातही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठीही जिल्ह्यातील बँकांचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट झाले आहे.ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग उभारणीसाठी अनुदान व आर्थिक सहाय्य पुरवते.त्यामुळे या योजनांचा लाभ अधिकाधिक बेरोजगारांनी घ्यावा,असे आवाहन गायकवाड यांनी केले.गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक व बाहेरील उद्योजकांसाठी गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाले असून,बँकांकडून उद्योगांसाठी आवश्यक असलेली पतनिर्मिती तत्परतेने करण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी सांगितले.यशस्वी अंमलबजावणीसाठी अग्रणी बँक व्यवस्थापक,सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी-कर्मचारी,खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी मेश्राम व कर्मचारी,जिल्हा परिषदेचे उमेद (MSRLM), माविम तसेच मिटकॉन आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) या प्रशिक्षण संस्थांनी मोलाची भूमिका बजावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!