Monday, July 13, 2026
Homeगोंदिया३६ वर्षीय लेखापालास अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक…

३६ वर्षीय लेखापालास अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल याला कंत्राटी आरोग्य सेविका यांच्याकडून प्रोत्साहन भत्ता काढून देण्यासाठी अडीच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.ही कारवाई आज, गुरुवार दिनांक-१ ऑगस्ट सायंकाळी ४ च्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाच्या पथकाने केली.सुरेश रामकिशोर शरणागत वय ३६ वर्षे लेखापाल (कंत्राटी),तालुका नियंत्रण पथक,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे.

तक्रारदार या तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गिधाडी येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून त्यांना शासनाकडून १६ हजार ५०० रूपयाचे ईसेंटीव्ह देण्यात येणार होते.दरम्यान,त्यांनी आरोपी लेखापाल यांच्याकडे सदर प्रोत्साहन भत्ता काढून देण्याकरीता विनंती केली होती.मात्र संशयित आरोपीने सदर प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे ३ हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवली.या अनुषंगाने पथकातर्फे आज गुरुवारी सापळा रचत कारवाई केली.लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपीला पंचासमक्ष तडजोडीअंती २ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम,पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले,पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,सहायक फौजदार करपे,पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर,नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे,कैलास काटकर अशोक कापसे,प्रशांत सोनवाने,महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!