Wednesday, August 12, 2026
Homeगोंदिया२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यकास(राऊंड ऑफिसर)रंगेहाथ पकडले,तर उपस्थित दोन वनरक्षकांनाही ताब्यात घेण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.रमेश सखाराम पचारे वय ५७ वर्षे, वनक्षेत्र सहाय्यक,राजुली सहवनक्षेत्र,गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय असे लाच स्वीकारतांना पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे; तर नीलोत्पल हिरालाल शिकारे वय ३१ वर्षे,रा.शासकीय निवासस्थान केशोरी आणि चिंटू मंगलसिंग परिहार वय ३८ वर्षे,रा.टीचर कॉलनी,केशोरी हे दोघेही वनरक्षक असून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
प्रकरणातील तक्रारदार २४ वर्षीय तरुण असून त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे.बांधकामासाठी रेतीची आवश्यकता असल्याने मार्च-२०२६ मध्ये गावाजवळील नाल्यातून रेती आणत असतांना वनक्षेत्र सहाय्यक पचारे यांनी ट्रॅक्टर अडवून कारवाईची धमकी देत २५ हजार रुपयांची मागणी केली.त्यानंतर, ९ जुलै २०२६ रोजी तक्रारदार रॉयल्टीची रेती घराजवळ उतरवून रिकामा ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असतांना पचारे व वनरक्षक शिकारे यांनी ट्रॅक्टर अडवून चावी काढून घेतली.घराचे बांधकाम सुरू केल्यापासून एकही रुपया दिला नसल्याचे सांगत पुन्हा २५ हजारांची मागणी करण्यात आली.पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.दरम्यान,५ ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदाराला ८ ऑगस्ट रोजी परसटोला राउंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली.तक्रारदार तेथे हजर झाल्यानंतर पचारे व शिकारे यांनी प्रकरण ‘सेटलमेंट’ करण्याची तयारी दर्शवत २५ हजारांऐवजी २० हजार द्यावे लागतील म्हटल्यावर ८ ऑगस्ट रोजी २० हजारांवर तडजोड झाली.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सोमवार १० ऑगस्ट रोजी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर,काल मंगळवार ११ ऑगस्ट रोजी पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करून वनक्षेत्र सहाय्यक रमेश पचारे याला २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.याचवेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या वनरक्षक नीलोत्पल शिकारे व चिंटू परिहार यांनाही ताब्यात घेण्यात आले.लाच प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!