Tuesday, May 19, 2026
Homeगडचिरोली१ एप्रिलला ॲड बोधी रामटेके यांचा सत्कार सोहळा- सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित...

१ एप्रिलला ॲड बोधी रामटेके यांचा सत्कार सोहळा- सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

प्रा.मुनिश्वर बोरकर/गडचिरोली

गडचिरोली :- जगातील केवळ १५ विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या इरस्मस मुंडुस युरोपीयन स्कॉलरशिपसाठी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील चामोर्शी येथील कुशाग्र बुद्धी, हुशार,जिज्ञासू व चिकित्सक २५ वर्षाच्या तरुण तडफदार,प्राचार्य शाम रामटेके यांचे सुपुत्र ॲड.बोधी शाम रामटेके यांचा सत्कार सोहळा १ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास बळीराजा पॅलेस चामोर्शी रोड,गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. 

ॲड.बोधी शाम रामटेके यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख तथा सामाजीक कार्यकर्ते विलास निबोंरकर हे राहणार असुन,प्रमुख अतिथी म्हणुन मावा नाटे मावा राजचे प्रवर्तक तथा आदिवासी समाजाचे गाढे अभ्यासक डॉ. देवा तोफा मेंढा (धानोरा),आंबेडकरी चळवळीतील गाढे अभ्यासक नरेन गेडाम सावली,अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राजकीय गाढे अभ्यासक समाजसेवक रोहिदास राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ॲड.बोधी रामटेके यांनी जगातील १५ हुशार विद्यार्थ्यां मध्ये एक म्हणुन आपले स्थान पटकावले असुन गडचिरोली जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत भुषणावह व प्रेरणादायी बाब असुन; अश्या या होतकरू तरुण , तडफदार,युवकाला प्रोत्साहित करण्यासाठी या सत्कार सोहळ्या प्रसंगी तमाम आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरीता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल एज्युकेशन मुव्हमेंट महाराष्ट्र, सत्यशोधक फाऊंडेशन महाराष्ट्र,अनिस शाखा गडचिरोली,जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली, आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन गडचिरोली, आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली,संभाजी ब्रिगेड गडचिरोली,राष्ट्रीय ओबीसी महासंघ गडचिरोली आदींनी केलेले आहे.अश्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी खालील नंबरवर आर्थिक सहकार्य ( वर्गणी )online pay Number 9 4 2 3 6 2 l l 93  या नंबरवर पाठविण्याचे आवाहन धर्मानंद मेश्राम यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!